VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, २६ जानेवारी २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील (उबाठा शिवसेना) गटाचे चामोर्शी माजी तालुका प्रमुख मा.अमितजी यासलवार यांनी दिनांक २५ जानेवारी २०२५ रोज शनिवार ला गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आदरणीय ना. डॉ.आशिषजी जयस्वाल साहेब यांचे शुभहस्ते शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.

याक्षणी मा.संदिपजी बरडे (पाटील) शिवसेना संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा,मा.हेमंतजी जंबेवार शिवसेना सह संपर्क प्रमुख,मा.राकेशजी बेलसरे शिवसेना जिल्हा प्रमुख,मा.राजगोपालजी सुल्वावार शिवसेना जिल्हा संघटक,,मा.मोहसिनभाई (पप्पीभैय्या) पठाण शिवसेना तालुका प्रमुख चामोर्शी यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.त्यांच्या या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे चामोर्शी तालुक्यातील (उबाठा शिवसेना) गटाला खिंडार पडली असून,गडचिरोली जिल्ह्यातील या पक्षातील आणखी काही दिग्गज नेते शिवसेना पक्षात लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती असून,(शिवसेना उबाठा) गट नेस्तानाभूत होण्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे चित्र आहे.
