Thursday, July 30, 2026
HomePuneराज्यातील नाम फाउंडेशनने गडचिरोली जिल्ह्यातील विविध, गावात पाणलोट क्षेत्रात काम करून जिल्ह्याच्या...

राज्यातील नाम फाउंडेशनने गडचिरोली जिल्ह्यातील विविध, गावात पाणलोट क्षेत्रात काम करून जिल्ह्याच्या विकासात हातभार लावावे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांचे नाम फाउंडेशनला पुणे येथे आमंत्रण!

पुणे,१८ मार्च २०२५::- गडचिरोली महाराष्ट्र राज्यातील नाम फाउंडेशन ज्या चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे दुष्काळग्रस्त व महाराष्ट्रातील अनेक गाव पाणीदार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी व सर्वसामान्य गोरगरीब नागरिक यांच्यासोबत लोकसभागातून स्वखर्चाने गाव पाणीदार करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी महाराष्ट्र राज्यात भरीव योगदान देणारे अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन ला राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी सदिच्छा भेट घेतली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावे पाणीदार करण्यासाठी व सिंचन युक्त करण्यासाठी निमंत्रण केले.

प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी नाल्याची उपलब्धता आहे परंतु पाणी येतो नदी भरतो नाला भरतो व पाणी वाहून जातो यावर उपाययोजना करण्याचे त्यांच्याकडे मागणी केली व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी व नागरिक यांच्या पाणी दुष्काळी गावांना पाणीदार करण्याची आव्हान नाम फाउंडेशन कडे करण्यात आले व या निमंत्रणाची नाम फाउंडेशन चे प्रकल्प संचालक गणेश थोरात व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हार्दिक स्वागत केला व आपण गडचिरोली जिल्ह्यात गावे पाणीदार करण्यासाठी व खेड्यापाड्यात सिंचनासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले व लवकरच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याची मानवाधिकार संघटना चमू अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची भेट घेणार आहे.

या आमंत्रणाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गाव खेडे पाणीदार होतील असे चिन्ह नक्कीच निर्माण झाले आहे याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणयजी खुणे, मानवाधिकार संघटना प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारत खटी , राहुल भाऊ झोडे, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा ताई मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण भाऊ वाघाडे नानू भाऊ उपाध्ये, मुन्नाभाउ डहारे, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्निल मडावी, युवा नेते प्रशांत शहा,सुमेन विश्वास, शुभंकर चक्रवर्ती यांनीआभार केले आहे,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular