VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ०६ एफ्रिल २०२५::- गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा कार्यालय गोविंदपूर येथे आज गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय मानवाधिकार संघटना डॉ. सेल जिल्हाध्यक्षपदी डॉ सत्यजित पोद्दार यांची प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खूणे यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केले डॉ,सत्यजित पोद्दार चामोर्शी तालुक्यातील दुर्गापुर येथील रहिवाशी आहेत त्यांनी आजपर्यंत विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांचे संयुक्त विद्यमाने आज पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात विविध शिबिरे आयोजित केलेली आहे शेकडो रुग्णांना विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून निशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उल्लेखनीय कामगिरी केलेला आहे व चंद्रपूर येथे सुद्धा नेहमीच निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने घेण्यात आली व आज त्यांचे नियुक्ती गडचिरोली जिल्हा डॉक्टर सेल जिल्हाध्यक्षपदी करण्यात आले त्यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खूणे, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विस्वास, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा पौर्णिमा ताई विस्वास,प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदोरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानू भाऊ उपाध्ये,मुन्नाभाई डहारे,चामोर्शी तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड, महिला आघाडी तालुका अध्यक्षा विशाखा सिन्हा, कुरखेडा तालुका अध्यक्ष रुपालीताई कावळे, वडसा तालुका अध्यक्ष रजनीकांत गुरनुले, अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील मडावी भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले,
