Thursday, July 30, 2026
HomeChamorshiसंताजी नगर चामोर्शी येथे भगवान श्री राम व श्री भगवान हनुमान यांचा...

संताजी नगर चामोर्शी येथे भगवान श्री राम व श्री भगवान हनुमान यांचा मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला माजी आमदार डॉ देवराव होळी यांची विशेष उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मंदीर परीसरात सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी डॉ. देवराव होळी यांचे मानले विशेष आभार.

गडचिरोली/चामोर्शी, ०६ एप्रिल २०२५::- रोजी प्रभू श्री राम जन्मोत्सवाच्या मंगलमय प्रसंगी चामोर्शी येथील संताजी नगर येथे प्रभू श्रीराम व भगवान श्री हनुमान यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या सोहळ्याला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी विशेष उपस्थिती लावत प्रभू श्री राम व भगवान श्री हनुमान जी यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. या मंदिराच्या सभागृहासाठी संताजी नगर येथील नागरिकांनी डॉ देवराव होळी यांच्याकडे मागणी केली होती. डॉ. देवराव होळी यांनी आपण या सभागृहाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देवु असा शब्द दिला होता व आपल्या कार्यकाळात आमदार निधीतून 22.00 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत दिलेला शब्द पूर्ण केला.व सभागृहाचे काम पूर्णत्वास नेले. आज या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी डॉ देवराव होळी यांनी उपस्थीत सर्व भाविक भक्तांना प्रभू श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. मंदिराच्या सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी. व संताजी नगर येथील नागरिकांनी डॉ. देवराव होळी यांचे विशेष आभार मानले. यावेळी सतिश भांडेकर विलास पिपरे, एकनाथ सातपुते, पत्रू दूधबावरे, ओमदेव गव्हारे,सुखदेव पिपरे, प्रा. प्रदीप भांडेकर, निखिल धोडरे, सुखदेव पिपरे, संजय धोडरे, सविंद्र कोठारे, मुखरू पिपरे , अशोक भांडेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular