VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ७ एप्रिल २०२५::- रामनवमी निमित्य काल दि. ६ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली शहरात विविध ठिकाणी प्रभू श्रीराम यांची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी उपस्थिती दर्शवून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व पूजा अर्चा केली.

यावेळी शहरातील चारही मार्गावरून विविध झाकी तयार करून प्रभू श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल पदाधिकारी , कार्यकर्ते सह सर्व हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते.

यावेळी बजरंग दल गडचिरोली च्या वतीने नगर परिषद प्रांगणातून प्रभू श्रीराम यांची शोभायात्रा काढण्यात आली तसेच विश्व हिंदू परिषद च्या वतीने इंदिरा गांधी चौकात श्रीराम नवमीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

तसेच श्रीराम सेना, इंदिरानगर श्रीराम मंदिर सेवा समिती व विठ्ठल मंदिर सेवा समिती, सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली तथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखा लांझेडा, प्रभू श्रीराम देवस्थान सेवा सुधार कृती समिती रामनगर तसेच पराग मेश्राम यांच्या निवासस्थानी इत्यादी ठिकाणी प्रभू श्रीराम यांची मिरवणूक काढण्यात आली.

रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासर्व ठिकाणी भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी उपस्थिती दर्शवून मिरवणुकीत सहभाग घेतला व प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली यावेळी शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
