VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, ०७ एप्रिल २०२५::- अयोध्यापती प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा आज संपूर्ण जिल्ह्यात हिंदू बांधवांनी मोठ्या उत्साहाने साजरा केली.श्रीराम नवमी निमित्त अहेरी व आलापल्ली शहरातील अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह मिरवणूक,शोभायात्रेचे आयोजन करण्यात आली आहे.तसेच काही ठिकाणी पालखी मिरवणूकही काढण्यात आली.चौक आणि रस्त्यांना भगव्या पताका लावून सुशोभित केले आहे. श्रीराम नवमी हा दिवस हिंदू बांधवांना खूप मोठा उत्सव मानले जाते.बांधवांनी’भगव्या’झेंडा प्रत्येक चौक व गल्ली गल्लीत बांधून उत्सहात साजरा केले जातो.डीजेच्या तलावावार राम गाणेला नाचत मिरवणूक व शोभायात्रा काढतात,तसेच प्रत्येक ग्रामीण व शहर भागातील हा दिवशी श्रीराम व सीतादेवीचा कल्याणमहोत्सव कार्यक्रमाही पार पडतात,कल्याणमहोत्सवेला ग्रामस्थांनी ना चुकता उपस्थित राहून भगवान श्रीराम व सीतादेवीची दर्शन घेतात.त्यावेळी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी येथील अहेरी व आलापल्ली पालखी मिरवणूक व शोभायात्रेला सहभागी होत.
मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीरामाचा दर्शन घेतले.तसेच आलापल्ली येथे अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी येथील भाविकांना महाप्रसाद कार्यक्रमाही आयोजन करण्यात आली.त्यावेळी अजय कंकडालवार यांनी समस्त जनतेला श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा दिले.कंकडालवारांनी त्यावेळी गडचिरोल्ली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख समृद्धी लाभोया साठी प्रभू श्रीरामकडे प्रार्थना केले.यावेळी स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
