VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
श्रीराम जन्मोत्सव पर्वकाळ प्रसंगी संगीतमय श्रीमद् भागवत कथा,ज्ञानयज्ञ सोहळा अमिर्झा ता.जि.गडचिरोली येथे सोहळा आयोजित.
गडचिरोली, ०७ एप्रिल २०२५ मौजा-अमिर्झा (ता. जि. गडचिरोली) येथे श्रीराम जन्मोत्सव पर्वकाळ प्रसंगी संगीतमय श्रीमद् भागवत कथा,ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर अमिर्झा येथे करण्यात आले. हा पवित्र सोहळा दिनांक ३१ मार्च २०२५ ते ०७ एप्रिल २०२५ या कालावधीत ध्यानपाठ पुजा,रामधुन पालखी,सत्संग कार्यक्रम,प्रार्थना व हरिपाठ, भजन,किर्तन, श्रीरामकथा, गोपाळकाला असे विविध धार्मिक कार्यक्रम अमिर्झा येथे आयोजित करण्यात आले होते.या सोहळ्यात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. “या भागवत कथा प्रवचनातून चांगले विचार आत्मसात करत कृतीमध्ये आणल्यास या भागवत सप्ताहाचे चांगले फलित होते.असे विचार मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.
मा.खा.डाँ.अशोकजी नेते यांना सामाजिक कार्यात सोशल वर्क म्हणून डॉक्टरेट ही पदवी संपादीत केल्याने अमिर्झा या गावातील नागरिक व श्रीमद् भागवतातील मंडळाचे संपूर्ण सदस्यगण माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.कथा प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य श्री.बाळकृष्ण सुरासे महाराज साईधाम सेवाश्रम वारी शिर्डी यांच्या वाणीतून साकार केले.

या भागवत सप्ताहाला जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारतजी खटी, सिनेट सदस्य स्वरूपजी तारगे, सामाजिक नेते देविदास नागरे, डॉ.प्रमोद धारणे,संजय कोतपल्लीवार, चंदुभाऊ करंडे,सुरेश नागरे तसेच विशेषत यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने बंधू-भगिनी व बालगोपाल उपस्थित होते. हा संपूर्ण सप्ताह भक्तिरसात व आध्यात्मिक वातावरणात पार पडला.
