VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
बरेच अपघात होऊनही शासनाचे दुर्लक्ष.
गडचिरोली/आष्टी, ०८ एप्रिल २०२५::- चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली- जैरामपुर मार्गावरील नाल्यावर पुलीयाच्या बाजुने 2023 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने खड्डा पडून दोन वर्षे झाले बरेचसे दुचाकीस्वार यांचे रात्रीच्या वेळी अपघात झाले तरीही अधिकारी लक्ष्य देउन काम करीत नाही शासकिय बांधकाम विभाग सुस्त झोपेत असल्याचे दिसून येते आहे सदर पुलीयावरुन गडचिरोली जिल्यातील आमदार व खासदार तथा अधिकारी या पुलावरुन आजपर्यंत प्रवास केलेला नाही त्यामुळे या बाबींकडे त्यांचे लक्ष नाही त्या खड्यात रात्रोचे सुमारास बरेच दुचाकीस्वार कोसळले आहेत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर शासनाला जाग येणार आहे काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. या बाबीची त्वरित दखल घेऊन तो जीवघेणा खड्डा बुजवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.
