Saturday, May 23, 2026
HomeAshtiमहाशिवरात्री निमित्त चपराळा यात्रेचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न...

महाशिवरात्री निमित्त चपराळा यात्रेचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/आष्टी,१५ फेब्रुवारी २०२६::- चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील श्री हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित पारंपरिक यात्रेचा शुभारंभसोहळा आज माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार, पोलिस निरीक्षक विशाल काळे संजय पंदिलवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटे विधिवत पूजा, घटस्थापना आणि मंत्रोच्चारांनी यात्रेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे यात्रेला मोठी गर्दी होत आहे.

प्रशासनाच्या वतीने सुरक्षा व आवश्यक सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही यात्रा पुढील सहा दिवस सुरू राहणार असून हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा कं यांची चमू सज्ज झाली आहे

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular