Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiचामोर्शी शहरात रुग्णवाहीका अभावी नागरिक त्रस्त...

चामोर्शी शहरात रुग्णवाहीका अभावी नागरिक त्रस्त…

VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी येथे लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी नगरपंचायत येथे रुग्णवाहीका उपलब्ध करून द्यावे – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली,

गडचिरोली/ चामोर्शी, ११ एप्रिल २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व राजकीय केंद्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीस हजार पेक्षाही जास्त लोकसंख्या असणाऱ्या नगरपंचायत चामोर्शी येथे गेल्या कित्येक वर्षापासून एक बिमार रुग्णवाहीकाने नगर पंचायत द्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सेवा केल्या जात आहे परंतु इतक्या मोठ्या शहरात लोकसंख्येनुसार आवश्यक एक नवीन रुग्णवाहिका सोय नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची खूप मोठी फरफट होत आहे. त्यामुळे चामोर्शी शहरात अनेकदा रुग्ण तळफळत असतो, परंतु रुग्णाच्या नातेवाईकांना वेळेवर रुग्णवाहीका उपलब्ध होत नाही. सर्व रुग्ण हे खाजगी वाहनाने नेणे शक्य होत नाही? त्यामुळे खूप त्रासाचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. येथील नगरपंचायत यांचा सुद्धा या विषयावर सर्रास दुर्लक्ष असलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे नगरपंचायत करोडो रुपयांचे विकास कामे करीत आहे. परंतु नगरपंचायत द्वारे आवश्यक रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना करीत नाही? हा विषय गंभीर आहे या विषयाची दखल आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली द्वारे घेण्यात आली व सकाळीच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसाण यांच्या सोबत भ्रमणध्वनीवर बोलल्यावर पहिल्या बेलवर फोन उचलून त्यांनी मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष यांना सकारात्मक उत्तर देत नगरपंचायत चामोर्शी येथे रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, राज्य सरकारने नगरपंचायत चामोर्शी येथे तात्काळ रुग्णवाहीका उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खूणे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखा सिन्हा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular