VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
Gगडचिरोली/ भंडारा, २६ एप्रिल २०२५::- जिल्हा नियोजन सभागृह,भंडारा येथे कार्यशाळा मा. आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प,पोलीस अधीक्षक, DCF, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जि पं सदस्य,टाटा मोटर्स चे मा. शैलेश माहुलीकर,नाम फौंडेशनचे उमेश पाटील आणि मुख्यत्वे सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली.एकाच वेळी या कार्यशाळेत 92 ग्रामपंचायत यांचे ग्रामसभा ठराव व मागणीपत्र जमा झाले.प्रशासनाकडून नाम फौंडेशन व टाटा मोटर्स यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगून सर्व अधिकारी यांना सूचना वजा आदेश परिणय फुके यांनी दिलें.या मिटिंगमध्ये मा.परिणय फुके यांनी आश्वस्त केलेले,
मुद्दे-1.Mining फंडातून 1 कोटी रुपये भंडारा जिल्ह्यासाठी या योजनेसाठी राखीव ठेवण्यात येईल.

2.जिल्हा नियोजन समिती मधून 50 लाख रु या योजनेसाठी राखीव रहातील.
3.आमदार फंडातून 15 लाख गोंदिया व 15 लाख भंडारा साठी देण्यात येईल.
4.पुढील 4-5 वर्षात या योजनेसाठी 50 कोटी रुपये भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी खर्च करणार आहे असे सांगितले.
