VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
देसाईगंज वडसा येथे आयोजीत संत निरंकारी मिशन च्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,
डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप,
गडचिरोली/देसाईगंज (वडसा),२६ एप्रिल २०२५::- दिनांक 25 एप्रिल शुक्रवारी संत निरंकारी मिशन संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली द्वारा संत निरंकारी सत्संग भवन देसाईगंज वडसा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी संत निरंकारी सेवक व ईतर असे मिळून 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिर कार्यक्रमाला भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ देवराव होळी यांची विशेष उपस्थिती होती. डॉ देवराव होळी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी संत निरंकारी मिशनने समाजसेवेचे व्रत अंगिकारून सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असुन रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही या रक्तदानामुळे हजारो रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त उपलब्ध होते यामुळे रुग्णांना जीवनदान मिळतो यासारखे पुण्यकर्म कोणतेही नसुन संत निरंकारी मिशनचे सेवाकार्य हे कौतुकास्पद आहे असे सांगितले. तसेच संपूर्ण जिल्हाभरात संत निरंकारी मिशनचे झोनल इन्चार्ज किसनजी नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनच्या सेवकांनी समाजकार्याला वाहून घेत समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करत असुन एकोपा आणी बंधुभवाची शिकवण देत आहे.
त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक जितके करावे तितके कमी आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच भर उन्हात 200 रक्तदात्यानी रक्तदान करून उस्फुर्त सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला संत निरंकारी मिशन झोनल इन्चार्ज कीसनजी नागदेवे, डॉ. इंद्रप्रित टूटेजा, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक हेमंत बोरकुटे तसेच रक्तदाते व संत निरंकारी मंडळाचे स्वयसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
