Thursday, October 29, 2026
HomeGadchiroliजिल्ह्यातील नागरिकांनी गाळमुक्त धरण,गाळ युक्त शिवार योजनेचा लाभ घ्यावा - राष्ट्रीय मानवाधिकार...

जिल्ह्यातील नागरिकांनी गाळमुक्त धरण,गाळ युक्त शिवार योजनेचा लाभ घ्यावा – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २९ एप्रिल २०२५::- गडचिरोली तालुक्यातील मारदा येथे गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार, योजनेचा भव्य शुभारंभ, दिनांक 28 एप्रिल 2025 गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील ग्रामपंचायत मारदा येथे नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या सहकार्याने गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेचा भव्य शुभारंभ राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांचे शुभहस्ते करण्यात आले.

याआधी मारदा येथे सर्व ग्रामीण नागरिक पदाधिकारी यांची तलाव खोलीकरण करणे बाबत लोकसभागातून बैठक आयोजित करण्यात आली व सर्वानुमते सदर तलावाचे खोलीकरण आजपासून सुरू करण्यात आले उपस्थितांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील तमाम नागरिकांना गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेचा लाभ घेण्याचे जाहीर आव्हान केले यावेळी कालिदास कडयामी योगराज कडयामी,विश्वनाथ नरोटे, सनकु पोटावी,खुशाल पोटावी, रुपेश सातपुते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular