VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी तालुका पाणीदार करण्यासाठी नाम फाउंडेशन व टाटा मोटर्सचा पुढाकार,
चामोर्शी तालुक्यात 11 तलावाचे खोलीकरण होणार,
गडचिरोली/चामोर्शी, ३० एप्रिल २०२५::- चामोर्शी येथील पंचायत समिती येथे महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभाग नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांचे वतीने, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या सहकार्याने संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती चामोर्शी येथे तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, रोजगारसेवक यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत नाम फाउंडेशन चे उमेश पाटील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे डॉ,प्रणय खुणे व मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता गजभिये साहेब राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी उपस्थित होते उपस्थित त्यांना नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील, डॉ प्रणय खुणे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी चामोर्शी तालुक्यातील जयनगर,कृष्णनगर सोनापूर,मारोडा, जामगिरी,भोगोनबोडी,वाघधरा, नवग्राम,येनापुर,सोमणपल्ली, ठाकरी, या अकरा गावातील तलावाचे खोलीकरण केले जाणार आहे त्या अंतर्गत समस्त ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक उपस्थित होते आजच्या बैठकीत तलाव खोलीकरण करताना गावातील नागरिकांचा लोकसहभाग व्यापक प्रमाणात असावा याकरिता समन्वय करण्यात आला व व्यवस्थित चर्चा करून समस्त कामाचे रुपरेषा आखण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.
