Thursday, July 30, 2026
HomeChamorshiदिपकधाम गोशाळेच्या माध्यमातून चामोर्शी येथील युवकांनी घेतला गोमाता सेवेचा ध्यास,, माजी आमदार...

दिपकधाम गोशाळेच्या माध्यमातून चामोर्शी येथील युवकांनी घेतला गोमाता सेवेचा ध्यास,, माजी आमदार डॉ. होळी हे कार्य प्रेरणादायी असल्याचे व्यक्त केले…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ३० एप्रिल २०२५::- भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी गो शाळेला भेट देवून भव्य गोशाळा निर्मितीसाठी सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घेणार असल्याची दिली ग्वाही, चामोर्शी येथील युवकांनी गोमातेच्या संरक्षण व सेवेचा ध्यास घेवुन चिचडोह बॅरेज मार्गांवर दिपकधाम गोशाळा उभारली. या गोशाळेत सध्या 200 गोमाता असून यांच्या चाऱ्यापाण्यापासून त्यांच्या आरोग्यासाची नित्यनेमाने काळजी घेतात. युवकांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या या गोशाळेच्या विस्तारासाठी व मदतीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी हे पुढे सरसावले. त्यांनी दिनांक 29 एप्रिल मंगळवारी दीपकधाम गोशाळेला भेट दिली व तेथील गोमातांची व इतर जनावरांची पाहणी केली व गोशाळेच्या अध्यक्ष व सदस्यासोबत बैठक घेतली. या गोशाळेत आज 200 गोमातांची काळजी घेतली जाते. भविष्यात या गोशाळेचा विस्तार करून येथे जास्तीत जास्त संख्येत गोमातांची सेवा कशी करता येईल यासाठी यासाठी लागणाऱ्या निधीच्या पूर्ततेसाठी काय करता येइल यावर चर्चा करण्यात आली. माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी यावेळी आपण या गोशाळेच्या मदतीसाठी सर्वोतोपरी युवकांच्या पाठीशी असून या गोशाळेच्या विस्तारीकरणासाठी जोमाने कामाला लागणार असल्याची ग्वाही दिली. तसेच युवकांनी गोमातेच्या सेवेचा ध्यास घेवुन गोशाळेची उभारणी केली हे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी चामोर्शी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, भाजप बंगाली जिल्हा आघाडीचे अध्यक्ष सुरेश शहा, साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी दीपक धाम गोशाळा चामोर्शी चे अध्यक्ष अक्षय नागपुरे, उपाध्यक्ष प्रज्वल सोमनकर, सचिव विशाल सोमनकर कोषाध्यक्ष साईनाथ लटारे सहसचिव वैभव सोमनकर, सदस्य विशाल नागपुरे, प्रीतम तुळसकर, महादेव थोरेवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular