VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
प्रदेश स्तरीय संम्मेलनात माजी आमदार तथा राष्ट्रीय अनुसूचित, जाती विकास परिषद महासचिव डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती,
जयपूर/ झालाना, ०५ मे २०२५::- राष्ट्रीय अनुसूचित, जाती विकास परिषद आंबेडकर वेलफेअर सोसायटी झालाना, जयपूर राजस्थान येथे राष्ट्रीय संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. देवराव होळी यांनी सामाजिक कार्यातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला असुन दोनदा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून नेतृत्व केले आहे. सामाजिक हितासाठी कार्य करतांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते समाज हितासाठी कार्य करण्याची संधी मिळाल्याने पेशाने डॉ. असून सतत जनतेशी नाळ जुडलेली आहे व सदैव समाज हितासाठी कार्य केले असुन यापुढेही समाज सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासीत केले.**यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण मांगरीया, राजस्थान प्रदेश अध्यक्ष जगदीश मीना, राष्ट्रीय महामंत्री पी. सी. बैरवाल, महाराष्ट्र प्रदेश उध्यक्ष रवीजी सोमकुनवार,राष्ट्रीय महासचिव ज्योत्सना बैरवा, मध्यप्रदेश अध्यक्ष एच. आर. परमार, मध्यप्रदेश अध्यक्ष (st) मोनिका शाह भाटी, गुजरात प्रेदेश अध्यक्ष (st) हरेशजी परमार, दिल्ली प्रदेश अध्यक्ष धर्मपाल आर्या, राष्ट्रीय महासचिव रतनलाल बैरवा, राष्ट्रीय महासचिव विनोद दाहीया, राष्ट्रीय सचिव एस. आर. डेहरिया, तसेच 36 राज्यातील राष्ट्रीय विकास परिषद चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
