VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, २३ मे २०२५::- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्याचे औचित्य साधुन मौजा-ठाकरी (आष्टी) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडप व प्रवासी निवाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

हे बांधकाम माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत मंजूर झाले होते. या भव्य सभागृहाचे लोकार्पण मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “ठाकरी या गावासाठी दिलेले वचन आज पूर्ण करताना मला अत्यंत समाधान वाटते. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझा प्रयत्न नेहमीच राहील.

त्यांनी उपस्थित गावकऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले व पुढील काळातही गावातील अडचणी लक्षात घेऊन विकासाची गती कायम राहील, असा विश्वास दिला.पुढे म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी ठाकरीसारख्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन.”या कार्यक्रमाला प्रामुख्याने ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,ग्रामपंचायत सरपंच सौ. नंदाताई कुलसंगे,उपसरपंच विठ्ठल आचेवार,पो.पा. वासुदेव करडेलवार,राकेश जोरगोलवार, सदाशिव बोलगुलवार, सुधाकर मुतेलवार, सुमन झाडे, सरिता आचेवार, जयश्री मुतेवार, अंतकला कोडापे, विकास आचेवार, सत्य नारायण आचेवार, सत्य नारायण येबडवारतसेच गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण होते.
