Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य अजरामर,, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य अजरामर,, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी/

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचा समारोप.

गडचिरोली, ३१ मे २०२५::- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेले कार्य आजही अजरामर आहे. संघर्षाचा इतिहास लाभलेल्या भारत भूमीवर अनेक वीरांगनांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मातृभूमी साठी जीवन समर्पित करणाऱ्या वीरांगनामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रगण्य ठिकाणी येते. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो हा विचार आचरणात आणून जिवंतपणे देवत्वाला प्राप्त झालेली वीरांगना म्हणून अहिल्यादेवी कडे पाहिले जाते.

अहिल्यादेवींचे धार्मिक जीवन समृद्ध होते. ही समृद्धी त्यांच्या प्रयत्नातून , तपस्येतून निर्माण झाली होती. धर्मशील राजमातांच्या धर्माभिमानी कार्यामुळे त्यांना भारतीय मंदिराच्या प्रणेत्या म्हटले जाते. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोध्दार आणि निर्मिती केली. त्यांनी त्या काळात केलेले कार्य आजही अजरामर आहेत त्यामुळे त्यांचा विचार व कार्याचा आपण अंगीकार करत त्यांचा प्रसार करावा असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती समारंभाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा दि. २१ ते ३१ मे दरम्यान १० दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आज दि. ३१ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी या जयंती समारोहाचा समारोप करण्यात आला. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, माजी शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, डॉ नितीन कोडवते उपस्थित होते.

या जयंती सोहळ्या अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक भूपेश कुळमेथे यांनी तर आभार तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular