Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliसर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करणार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे...

सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करणार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०२ जून २०२५::- सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्यावर आपला भर असून त्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश बारसागडे यांनी व्यक्त केले.

आज पोरला जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त भाजप जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक रमेश बारसागडे यांचा सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी उपसभापती व भाजपा जिल्हा सचिव विलास केशवराव दशमुखे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी माजी सभापती मारोती ईचोडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बापूजी फरांडे, नागरी येथील सरपंच भूमिका बारसागडे, नवेगाव ग्रामपंचायत उपसरपंच राजू पाटील खंगार, भाजपचे नेते लोमेश कोलते, पांडुरंग समर्थ, ग्रामपंचायत सदस्य अनुबाई वाघरे, रवि सेलोटे, पांडुजी भोयर, विनोद म्हशाखेत्री.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular