Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliकुशल राजकारण, प्रशासक व निस्वार्थ चारित्र्याच्या धनी म्हणजे अहिल्यादेवी होत,, जिल्हा महामंत्री...

कुशल राजकारण, प्रशासक व निस्वार्थ चारित्र्याच्या धनी म्हणजे अहिल्यादेवी होत,, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कोटगल येथे राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्सव,

गडचिरोली, ०२ जून २०२५::- एक अद्वितीय राजकारण धुरंदर व कर्तृत्ववान राज्यकर्ता या नात्याने त्यांच्याकडे पाहताना त्यांचे स्त्रीत्व हे त्यांच्या सामर्थ्यात भर घालतांना दिसते. केवळ त्यांची जहागीर वा त्यांचे राज्य नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानला त्यांनी आई बनून आपल्या मायेच्या पदराची सावली दिली. सर्वसामान्य स्त्री ही चूल मूल यात अडकलेली, संपूर्णपणे परावलंबी, सामाजिक कुप्रथा, बहुपत्नित्व, बाळंतपणे यात अडकलेली अशी होती. स्त्रियांनी लौकिक शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती. पण या अंधाऱ्या काळातही काही मोजक्या स्त्रिया चमकत होत्या त्यापैकी एक म्हणजे अहिल्यादेवी होय.

नेतृत्व,कर्तृत्व, दातृत्व अन मातृत्व या चारही विषयात त्या अलौकिक ठरल्या. अत्यंत शुद्ध, निष्कलंक चारित्र्य, अलोट श्रीमंती असूनही पराकोटीची साधी राहणी, निस्वार्थ , निर्लेप, निर्मोही वृत्ती यामुळे `पुण्यश्लोक’ , गंगाजल निर्मळ अशा पदव्या त्यांना मिळाल्या. त्याकाळची सतीची प्रथा व सती जाणे हे महापुण्य समजले जायचे मात्र या कल्पनेला बळी न पडता स्वयं निर्णयाने जीवन व जबाबदारी याचा स्वीकार केला मल्हारराव यांच्या हाताखाली व त्यांच्या सोबत काम करताना मिळालेल्या संधीचा पूरेपूर वापर करून कुशल राजनीती व प्रशासन यात त्या पारंगत झाल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांचे कार्य आजही अजरामर आहे असे प्रतिपादन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य भारतीय जनता पार्टी तालुका गडचिरोली च्या वतीने काल दि. ३१ मे २०२५ रोजी कोटगल येथे आरोग्य मेळावा, महिला मेळावा व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते होते . प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके , जिल्हा सचिव रंजिता कोडाप, तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, माजी तालुका अध्यक्ष विलास भांडेकर , कोटगल च्या सरपंच ममता दूधबावरे , पुष्पा करकाडे, ज्योती बागडे, पल्लवी बारापात्रे, स्वाती चंदनखेडे मुस्कान पठाण उपस्थित होते.* *या जयंती सोहळ्या अंतर्गत रांगोळी,वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात शेकडो महिला व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते , नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुका अध्यक्ष विलास भांडेकर यांनी तर संचालन तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular