Sunday, May 24, 2026
HomeGadchiroli"शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे संस्कार आपल्या अंगीकारा" – आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे...

“शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे संस्कार आपल्या अंगीकारा” – आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न,

गडचिरोली, २३ जून २०२५ ::- नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ गडचिरोली जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात झाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.

या उपक्रमाचे औचित्य साधून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी गोगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सदिच्छा भेट दिली.

त्यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या शालेय जीवनातील नव्या प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी स्वतः सजवलेल्या पारंपरिक बैलबंडीला हाक देत विद्यार्थ्यांना बसवून शाळेपर्यंत सवारी घडवली.

गावातील ग्रामीण संस्कृतीचा सुगंध जपत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत फेरी काढण्यात आली.या अनोख्या उपक्रमामुळे गावातील वातावरण शिक्षणमय आणि आनंददायी झाले.

शाळेच्या प्रवेशद्वारावर आमदार डॉ. नरोटे यांच्या शुभहस्ते फीत कापून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर, कंपास बॉक्स यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना आत्मविश्वास, जिद्द आणि नवे स्वप्न उराशी बाळगण्याचे आवाहन केले.”विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता शिस्त, प्रामाणिकपणा, स्वच्छतेची सवय अंगीकारावी. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे संस्कार यांची सांगड घालून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात नवे शिखर गाठता येते.

मेहनतीला पर्याय नाही; तुम्ही मेहनतीत कधीही कमीपणा ठेवू नका,” असे प्रेरणादायी विचार आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी जि. प. गडचिरोली विवेकजी नाकाडे, सरपंच राजूभाऊ उंदीरवाडे, उपसरपंच निलेश दाकोटे, केंद्रप्रमुख रवींद्रजी मुलकलवार, पोलीस पाटील उत्तमजी मुनघाटे, शा. व्य. समिती सदस्य नम्रता ताई चापले, गोपालजी देशमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही शाळा व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular