VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली ची मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ,
गडचिरोली, २३ जून २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील विवीध प्रलंबित समस्या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांचे नैतृत्वात मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब,मा.सहायक प्रशासन अधिकारी श्री धनंजय दुमपेटीवार साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री वैभव बारेकर साहेब,कनिष्ठ सहाय्यक श्री हावलादार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन,निवेदन देऊन दिनांक:-२०/०६/२०२५ चर्चा केली.

ह्या आहेत शिक्षकांच्या प्रलंबित समस्या : –
१)जुलै २०२४ पासुन ८ महिन्याची ३% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. २) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा लाभ तात्काळ देण्यात यावे. ३) आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे आलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावे. ४) वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या G.P.F. पावत्या त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे.
५) पदवीधर विषय शिक्षकांची रिक्त पदे सेवाज्येष्ठते नुसार त्वरीत भरण्यात यावे.
६) वरिष्ठ/निवड श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षण पुर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात यावे. ७) कोर्टाच्या निर्देशानानुसार १ जानेवारी २००६ ते ३१ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीतील उर्वरित शिक्षकांची १५% प्रोत्साहन भत्ता थकबाकीची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. ८) सेवा पुस्तिका अद्यावत करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प लावण्यात संदर्भात मा.गटशिक्षणाधिकारी यांना सुचना देण्यात यावे. ९) शासन निर्णय २ जून २०२५ नुसार प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनातील त्रृटी दुर करुन वेतन निश्चिती करण्यात यावी. १०) ४% सादील अनुदान जिल्हा परिषद शाळांना त्वरीत अदा करण्यात यावे. ११) मयत शिक्षक काशिनाथ मल्लाजी पुरकलवार यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्वरीत मंजूर करण्यात यावे. १२) सेवा निवृत्त शिक्षक श्री नुसरत मसुद शेख यांची एकस्तर वेतनाची वसुली व गट विमा निधी त्वरीत देण्यात यावे.यांसह इतरही मागण्यांचा समावेश निवेदनात होता.

याप्रसंगी निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाकोषाध्यक्ष राजेश चिलमवार,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे चामोर्शी तालुका सरचिटणीस मारोती वनकर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गडचिरोली चे सरचिटणीस संजय मडावी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा एटापल्ली चे माजी तालुकाध्यक्ष तेजराज नंदगिरवार,चामोर्शी तालुका संघटक अशोक जुवारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वडसा तालुका संघटक सुरज येलमुले,चामोर्शी तालुका संघटक बालाजी पवार, अविनाश बारसागडे,अशोक गुरनुले,आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी चर्चेत मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब यांनी सर्व प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे.तसेच वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या G.P.F.पावत्या १५ दिवसानंतर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे.
