VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांचा 22 जुलै 2025 रोजी लायड्स मेटल अँड एनर्जी कंपनी कोनसरी येथे वाढदिवस कार्यक्रम,
गडचिरोली /चामोर्शी, १८ जुलै २०२५::- महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाडक्या बहिणीसोबत आपला वाढदिवस साध्या पद्धतीने स्थानिक पालकतत्व असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी माता भागिनी,लाडक्या बहिणी सोबत साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रम निमित्याने नियोजन बैठक भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडली.
यावेळी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख व साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, सुरेश शहा, निखिल धोडरे, दिपक वासेकर, प्रतीक राठी, उमेश पिटाले, प्रज्वल सोमनकर, प्रतीक चिचघरे, सुमित कुमरे, अंशुल दासरवार आदी उपस्थित होते.
