VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कोरची, धानोरा, गडचिरोली, आरमोरी, सिरोंचा तालुक्यात कार्यकारिणी गठीत करण्याचे उद्दिष्ट – इच्छुकांनी तातडीने संपर्क साधावा: डॉ. प्रणय खुणे यांचे आवाहन,
गडचिरोली; २१ जुलै २०२५::- राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने कोरची, धानोरा, गडचिरोली, आरमोरी व सिरोंचा तालुक्यात संघटनात्मक कार्यकारिणी गठीत करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मानवाधिकार विषयक सामाजिक उपक्रम राबविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधावा व आपल्या तालुक्याचे सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे,ही माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञानेंद्र विश्वास,राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा ताई विस्वास प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी व राहुल भाऊ झोडे, सल्लागार देवानंद भाऊ खुणे, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी आणि जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये यांनी संयुक्तपणे दिली आहे.
संघटनेच्या वतीने गरिब, आदिवासी, शोषित, पीडित, महिलांचे प्रश्न, प्रशासनातील अन्याय-अत्याचार, भ्रष्टाचारविरोधी लढे आणि सामाजिक न्यायासाठी भूमिका बजावली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर सक्षम व संवेदनशील कार्यकारिणी उभी राहणे ही काळाची गरज असल्याचे असे प्रतिपादन डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी आहे.**संपर्कासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी किंवा स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधावा.*> “संघटन मजबूत तर लढा प्रभावी! – हा आमचा नारा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकशाही मूलभूत अधिकार रक्षणासाठी संघटनेचे बळ वाढविणे हे आमचे लक्ष्य आहे,” असे आवाहन डॉ. प्रणय खुणे यांनी आवर्जून केले.
