VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची एटापल्ली तालुका महिला आघाडी कार्यकारिणी गठीत,
गडचिरोली /एटापल्ली,जुलै २०२५::- एटापल्ली राष्ट्रीय मानवाधिकार संघठन (असो) सियेसन दिल्ली.जिल्हा गडचिरोली च्या वतीने एटापल्ली तालुका महिला आघाडी कार्यकारिणी डा. प्रणय खुणे यांच्या सुचनेनुसार विदर्भ अध्यक्ष जावेद अली. यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एटापल्ली येथील विश्राम गृह येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची महिला तालुका कर्यकारिणी गठीत करून घोषित करण्यात आली आहे.

यावेळी महिला तालुका अध्यक्ष.सुनीता मोहन चांदेकर.महिला उपाध्यक्ष वैशाली मारुती सोनटक्के महिला सचिव. रेहाना नसरुद्दीन शेख.महिला सह सचिव. शालिनी संतोष नैताम. महिला कोषध्यक्ष जया मासू कुडो. प्रसिद्धी प्रमुख जयश्री अशोक खोब्रागडे. ता. उपाध्यक्ष कु. गुलशन बानो हनिफ शेख.यांची पदाधिकारी निवड करण्यात आली व सदस्याबेबी ताई विनोद खोब्रागडे.मनीषा नमेवार. शिल्पा अलोणे. रीना बेपारी. अनिता खोब्रागडे. रेहाना शेख. कलिमा शेख. शीतल नागनाथ दडमल. हौसा मारुती खरात यांची एकमताने निवड करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी सांगितले की राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने एटापल्ली तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येईल, तालुक्यातील सामाजिक कार्य करण्यास इच्छुक महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आले यावेळी उपस्थित महिला पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हमीद खान पठाण. तालुका उपाध्यक्ष आसिफ खान पठाण उपस्थित होते,
