VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चंद्रपूर/सिंदेवाही, २१ जुलै २०२५::- सिंदेवाही-लोनवाही जि.चद्रपुर येथे नगरपंचायत नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वितरण कार्यक्रमा प्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान सोबत विधिमंडळ नेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी उद्घाटन करुन इमारतीची पाहणी केली व वृक्षारोपण करून मार्गदर्शन केले.

तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व दिव्यांगाना धनादेश वितरण कारण्यांत आले.* यावेळी नगराध्यक्ष भास्करजी नन्नावार, नगर उपाध्यक्ष सौ.पुजाताई रामटेके, मुख्याधिकारी नगरपंचायत सिंदेवाही सौ.अर्शिया जुही, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिंदेवाही रमाकांतजी लोधे, सभापती सार्वजनिक बांधकाम मयुरजी सुचक, सभापती महिला व बालकल्याण सौ. वैशाली पुपरेर्डीवार, सभापती पाणीपुरवठा सौ.अजुताई भैसारे,

उपसभापती महिला व बाल कल्याण सौ.अस्मिता जुमनाके, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक स्वप्निलजी कावळे, सौ.मोहनीताई मेश्राम, नगरसेवक पंकजजी नन्नेवार, दिलीपजी रामटेके, श्यामजी छत्रवाणी, सौ. दिपाताई पुस्तोडे, सौ. अपुर्वाताई चिंत्तलवार, सौ. निताताई रणदिवे, श्रीमती मीनाक्षीताई मेश्राम, सौ. स्वेताताई मोहुर्ले, युनुसजी शेख, किशोरजी भरडकर, अमृतजी मडावी, सुनीलजी उट्टलवार पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपंचायत कर्मचारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.
