VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मार्कंडेश्वर मंदिर व उत्तर वाहिनी वैनगंगा नदीला १०८ परिक्रमा सुरू,
हजारो भाविक भक्तांची मोठी गर्दी,
गडचिरोली /चामोर्शी, २१ जुलै २०२५::- जिल्ह्यातील तीर्थस्थळ म्हणून ओळखले जात असलेले मार्कडा देव येथीलवैनगंगा नदीच्या काठावर व उत्तर वाहिनी स्थळावर वसलेले मार्कंडेश्वर मंदिराचे जिर्णोद्धार काम गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळले होते ते काम कारागिरांची संख्येत वाढ करून ते अविरत सुरू ठेवत पूर्ण करावे यासाठी प्रशासन व भारतीय पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार निवेदन देत पाठपुरावा करण्यात आला मात्र प्रशासनानी दखल न घेतल्याने अखेर २१ जुलै पासून दुपारी मार्कंडेश्वर देवस्थान व उत्तर वाहिनी वैनगंगा नदीला १०८ पराक्रमाला प.पू.संत मुरलीधर महाराज सुरुवात केली आहे यावेळी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मार्कंडेश्वर मंदिर जिर्णोद्वार गेल्या दहा वर्षांपासून शासन , प्रशासन,लोकप्रतिनिधी व भारतीय पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेंगाळले असून त्या कामाला गती मिळाली, जिर्णोद्वार काम करणारे कारागिरांची संख्येत वाढ करून अविरत काम करून जिर्णोद्वार पूर्णत्वास न्यावे यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले जावे म्हणून प. पू श्री. संत मुर्लीधर महाराज यांच्या सह श्री मार्कंडेश्वर जिर्णोध्धार समिती, स्थानिक सरपंच, व समस्त गावकरी व भक्तगण यांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाठपुरावा केला पण दुर्लक्ष केले जात असल्याने ह्या कामाला पुन्हा दहा वर्ष लागू शकते याची खात्री झाली.

संत मुरलीधर महाराज व त्यांच्या शिष्टमंडळाने ०८ जुलै २०२५ रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधी, भारतीय पुरातत्व विभाग , पोलिस विभाग यांना प.पू. श्री. मुर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात 21 जुलाई पासून संपूर्ण उत्तर वाहिनी वैनगंगा नदीला 108 परिक्रमा समस्त गावकरी आणि भक्तगण यांना घेऊन” मार्कंडा – रामाळा – घारगाव हरणघाट कवठी रुद्रापूर उसेगाव- जीबगाव- शिरसी-साखरी लोंढोली चीचडोह बॅरेज चामोर्शी क्रोसिंग मार्कंडादेव ” या गावातून अंदाजे 51 कि.मी. दररोज परिक्रमा करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले मात्र निवेदनाची दखल घेतली नाही या कडे प्रशासन दुर्लक्ष केले.
अखेर प. पू. संत मुरलीधर महाराज यांनी २१ जुलै रोजी दुपारी मार्कंडेश्वर मंदिर व उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या दोन्ही जिल्ह्याच्या विविध गावातून एकूण 108 परीक्रमांला मार्कंडेश्वर मंदिरात पूजा अर्चा करून ढोल ताशाच्या गजरात समस्त भक्तगणसह सुरुवात केली आहे यावेळी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी चामोर्शी पोलीस अधिकारी व पोलिस उपस्थित होते.
मार्कंडेश्वर मंदिर व उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या १०८ परीक्रमाला सुरुवात करताना आता मी जिर्णोद्वार काम पूर्णत्वास नेण्यासाठी माझे प्राण गेले तरी चालेल पण मी थांबणार नाही यासाठी मला साथ द्या, माझ्या पाठीशी उभे रहा, परिक्रमा स्थळावरील ग्रामस्थानी पाठिंबा द्या तुमच्या साथीने प्रतिक्रमा पूर्ण करेन असे भावनिक आवाहन भाविक भक्ताना प. पू.संत मुरलीधर महाराज यांनी केले आहे.
