Sunday, May 24, 2026
HomeChamorshiगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री डाॅ.मिलिंद नरोटे साहेब यांची विविध...

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री डाॅ.मिलिंद नरोटे साहेब यांची विविध संघटनांचे पदाधिकारी तथा शिक्षकांशी सकारात्मक चर्चा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री डाॅ.मिलिंद नरोटे साहेब यांची चामोर्शी शिक्षक पतसंस्थेतील सभेत चामोर्शी तालुका व जिल्हास्तरावरील शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यां व अडचणींवर विविध संघटनांचे पदाधिकारी तथा शिक्षकांशी सकारात्मक चर्चा आणि सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याबाबत आश्वासन.

गडचिरोली/ चामोर्शी, ०५ ऑगस्ट २०२५::- दिनांक:- ०२/०८/२०२५. रोज शनिवारला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. डाॅ.मिलिंद नरोटे साहेब यांनी चामोर्शी येथे प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात भेट देऊन शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी व प्राथमिक शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली.

चर्चेदरम्यान:-

▪️शैक्षणिक गुणवत्ता वाढ, ▪️डिजिटल शिक्षणातील अडचणी, ▪️शाळांना आवश्यक पायाभूत भौतिक सुविधा इत्यादी संदर्भात शाळेत येणा-या अडचणी, ▪️प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे, ▪️समान काम समान वेतन या तत्वानुसार ६ ते ८ व्या वर्गावर शिकविणा-या सर्व विषय शिक्षकांना पदवीधर प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी विनाअट लागू करण्यात यावी, ▪️जिल्हा परिषद च्या उच्च प्राथमिक शाळांवर कला व क्रीडा शिक्षकांची स्वतंत्र पदे निर्माण करण्यात यावी, ▪️१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयातील सरकारी शाळांना अडचणीत आणणा-या शिक्षकांची हजारो पदें अतिरिक्त ठरवणा-या अन्यायकारक अटी रद्द करण्यात याव्यात, ▪️ ग्रामपंचायत स्तरावर शाळा,अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खर्च करावयाच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी, ▪️भविष्यातील योजावयाच्या उपाययोजना यांसह, ▪️प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या राज्य,जिल्हा व तालुका स्तरावरील विविध समस्यां व अडचणीं सहानुभूतीपूर्वक जाणून घेतल्या.

• तसेच त्यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

चर्चेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या राज्य,जिल्हा व तालुका स्तरावरील विविध समस्या टप्या-टप्प्याने शासन, प्रशासनाशी पाठपुरावा करून लवकरात लवकर सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याबाबतचे आश्वासन शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व उपस्थित शिक्षकांना दिले.

याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. डाॅ.मिलिंद नरोटे साहेब यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका चामोर्शी व जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने पुष्पगुच्छ,शाल व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. भेटीप्रसंगी भाजपा ओबिसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री अनिल पोहनकर गडचिरोली जिल्हा भाजपा युवा मोर्चा महामंत्री, श्री. मधुकर भांडेकर,स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज गडचिरोली चे संस्थापक श्री सतीश चिचघरे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,शिक्षक परिषदेचे नेते श्री अविनाश तालापल्लीवार, तळोधीचे मुख्याध्यापक श्री प्रशांत बनकर,गडचिरोली शिक्षक संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्री अशिमकुमार बिश्वास,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री मारोती वनकर,

शिक्षक संघाचे तालुका कार्याध्यक्ष श्री महादेव डे, तालुका मुख्य सल्लागार श्री सिद्धार्थ सोरते सर, कायदेविषयक सल्लागार प्रमुख श्री पुरुषोत्तम गायकवाड,माजी युवा आघाडी अध्यक्ष श्री सुजीत दास,प्रसिद्ध प्रमुख श्री सुनिल सातपुते,कार्यालयीन चिटणीस श्री हरिष नंदनवार, सहकार्याध्यक्ष श्री प्रशांत पोयाम,बिटप्रमुख श्री दिगांबर पेंदाम,महीला आघाडी प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुनिता लांबाडे मॅडम,श्रीमती वर्षा गौरकर मॅडम यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे व तालुक्यातील इतरही संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी शिक्षक-बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular