Saturday, June 6, 2026
HomeKurakhedaभाजप कुरखेडा तालुका कार्यकारिणी बैठक उत्साहात पार पडली;बैठकीला मा.खा. डॉ. अशोकजी नेते...

भाजप कुरखेडा तालुका कार्यकारिणी बैठक उत्साहात पार पडली;बैठकीला मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

तसेच शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला सुद्धा भेट,

गडचिरोली/कुरखेडा, ०७ ऑगस्ट २०२५::- भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ७ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते,

भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार कृष्णाजी गजबे, ओबिसी प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जेष्ठ नेते गणपत सोनकुसरे, रविद्रजी गोटेफोडे, ता.महामंत्री डॉ. मनोहर आत्राम, सहकार नेते वसंतराव मेश्राम, जिल्हा सचिव रुपाली कावळे,यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “मोदी सरकारचे विकासाभिमुख कामे,तसेच लोक कल्याणकारी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवा,आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकांसाठी कार्यकर्ते सज्ज व्हा,

हीच विजयाची गुरुकिल्ली आहे.”असे मत मा.खा.डॉ. नेते यांनी व्यक्त केले. यावेळी नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष चांगदेव फाये तर संचालन ता.महामंत्री विनोद नागपूरकर व आभार भाजपा तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण मुंगणकर यांनी केले.

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा – कुरखेडा उपोषणस्थळी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची भेट*या बैठकीनंतर, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कुरखेडा येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला.“शेतकऱ्यांच्या मागण्या शासना पर्यत पोहचवले जाईल व यात तत्काळ तोडगा काढला जाईल,तसेच “हा लढा शेवटपर्यंत साथ देत न्याय मिळवून देऊ,” असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular