Saturday, June 13, 2026
HomeAheriअहेरी एसटी आगारात आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन - अजय कंकडलावार यांच्या प्रमुख...

अहेरी एसटी आगारात आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन – अजय कंकडलावार यांच्या प्रमुख उपस्थित…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी

गडचिरोली/अहेरी, १० ऑगस्ट २०२५::- एस.टी.महामंडळ अहेरी आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेतर्फे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजय कंकडलावार होते.त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते बिरसा मुंडा,वीर बाबुराव शेडमाके तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून त्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे अहेरी आगार अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार म्हणाले.संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित एस.टी.कर्मचाऱ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular