VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गोंदिया/देवरी, ०३ सप्टेंबर २०२५ ::- गणेशोत्सवाच्या पावन वातावरणात देवरी शहरात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सुरुवातीला मा.खा. डॉ. नेते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिडिसिसी बँकेचे संचालक मान.श्री. प्रमोदजी संगिडवार तसेच गोंदिया/भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बाळाभाऊ उर्फ विरेंद्रजी अंजनकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पा व जेष्ठा गौरी (महालक्ष्मी) चे दर्शन घेतले. श्रद्धा व भक्तिभावाने पूजा-अर्चा करून डॉ. नेते यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच नुकतेच जिल्हा सहकारी को-ऑप. (जिडिसिसी) बँकेचे संचालक पदी निवड झालेले माननीय श्री. प्रमोदजी संगिडवार यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यासोबत माजी खासदार डॉ.अशोकजी नेते यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

या वेळी डॉ. नेते म्हणाले की, “प्रमोदजी यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागतील, अशी आम्हाला खात्री आहे,” असे त्यांनी नमूद केले.अशा या विविध कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून जेष्ठ नेते झामसिंगजी येरणे, देवरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष संजयजी ऊईके, भाजपाचे जिल्हा महामंत्री अनिल येरणे, नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा प्रज्ञाताई संगिडवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण दहिकर, संचालक कृ.उ.बा.स. देवरीचे यादवराव पंचमवार, देवरी पोलीस ठाण्याचे थानेदार डांगे सर, जिल्हा परिषद सदस्या सौ. कल्पना वालोदे, पंचायत समिती सदस्या गावडताई, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, अनु.जाती मोर्चा तालुकाध्यक्ष नितेश वालोदे, भाजपाचे युवा नेते हितेश डोंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर डॉ. नेते यांनी झामसिंगजी येरणे यांच्या महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रास उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

तसेच देवरी शहरातील भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत संघटनात्मक घडामोडी, स्थानिक प्रश्न आणि आगामी कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.देवरीतील या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, प्रमोदजी संगिडवार यांच्या नव्या जबाबदारीमुळे परिसरातील शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होईल, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
