VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
शांत,संयमी, मृदु स्वभावाच्या तुषार यांच्या निधनाने डॉ. होळी व मित्र परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर,
गडचिरोली/चामोर्शी, ०३ सप्टेंबर २०२५::- भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे राहणारा व लहानपणी पासूनच त्यांच्या परिवारासोबत राहणारा मृदु शांत व संयमी स्वभाचा असा विश्वासू साथीदार तुषार सातपुते रा. खंडाळा तालुका चामोर्शी यांचा दोन दिवसापूर्वी हरणघाट पुलाजवळ अपघात झाला. त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर दुखापत असल्याने नागपुर येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान 2 सप्टेंबर मंगळवारी रात्री दहा वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. दिनांक 3 सप्टेंबर बुधवारी दुपारी चार वाजता खंडाळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मजी आमदार डॉ देवराव होळी यांचा अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्याची ओळख होती. त्यांच्या दैनदींन दौऱ्यापासुन त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची भेटीची बातमी प्रसारित करण्याची तो जबाबदारी तो कार्य तत्परतेने सांभाळायचा. डॉ. देवराव होळी त्यांनी त्याला एक परिवाराचा सदस्य म्हणून वागवायचे. तो सावली प्रमाणे त्यांच्या पाठीमागे असायचा आज त्याच्या अशा आकस्मिक अपघाती निधनाने त्याच्या परिवारासोबत डॉ.देवराव होळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
