VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १६ सप्टेंबर २०२५::- विश्व गौरव आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत प्रदेश युवा मोर्चा ने दिलेल्या नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजना करिता भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे कर्तबगार युवा आ.मा.श्री.डॉ मिलिंदजी नरोटे मा.श्री.अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी मा.श्री मधुकरजी भांडेकर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली तसेच गडचिरोली शहर व ग्रामीण भागातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते .


