VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
ब्रह्मपुरी, १५ सप्टेंबर २०२५::- ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून दुरूस्ती व गावातील नागरिकांना वाहतुकीस योग्य रस्ता संबंधित रेती ठेकेदार करून द्यावा म्हणून आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार,रणमोचन गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,रणमोचन ते रणमोचन फाटा (लामना फाटा) पर्यंतचा दोन किलोमीटरचा रस्ता हा रेतीचा ट्रक ओवरलोड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये- जा करणार्या वाहनांना व पायी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रणमोचन गावातील रेती घाटाचे हेवी लोड असलेले ट्रक या रस्त्यावर सतत ये-जा करत असल्यामुळे रस्ता पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.आता अशी परिस्थिती “रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता” अशी दयनीय अवस्था रस्त्यांची झालेली आहे.
रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण झाले आहे.जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते.जर वाहतूक करताना अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण असा प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे.

रणमोचन गावातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यांची इतकी दयनीय अवस्था होवून सुद्धा रणमोचन या गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील पदाधिकारी,गावातील सरपंच,सदस्य याकडे पूर्णता दुर्लक्ष करीत आहे.
वंचित बहुजन महीला आघाडी ब्रम्हपुरी व रणमोचन गावातील नागरिकांची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी. आपण तात्काळ रणमोचन या गावातील रस्त्यांची पूर्ववत दुरूस्ती करून तो ग्रामस्थांच्या वापरासाठी योग्य अवस्थेत आणावा. ही मागणी निवेदनातु केली आहे.
निवेदन देतांना उपस्थित कार्यकर्ते:-
लिनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्षा, गणेश शेंडे,गंगाधर ढोरे, लता मेश्राम,चंदा माटे,सुकेशनी चौधरी,सारीका खोब्रागडे,अनुपमा जनबंधू, विजया खोब्रागडे,विद्या बागडे, निरू खोब्रागडे शिला निहाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
