Saturday, May 23, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)येथे बाल संसद सभेचे आयोजन...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)येथे बाल संसद सभेचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, १९ सप्टेंबर २०२५::- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल‌‌‌ येथे आज दिनांक १७/०९/२०२५ रोज बुधवार ला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल संसद सभेचे आयोजन करण्यात आले.आजच्या बाल संसद सभेच्या अध्यक्षस्थानी शालेय मुख्यमंत्री पवन सरपे व प्रमुख अतिथी म्हणून शालेय मंत्रीमंडळातील त्याचे सर्व सहकारी उपस्थित होते.

आजच्या बाल संसद सभेला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री रघुनाथ भांडेकर,मुरखळा (माल‌‌‌ )ग्रामप़ंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेन्द्र बारसागडे,कैवल्य फाऊंडेशनचे फेलो- श्री गौरव सिन्हा,श्री चंद्रकांत प्रधान, लर्निग लिंक फाउंडेशनच्या ट्रेनर कु.प्रतिक्षा किरमिरे,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे,श्री चंद्रकांत वेटे,श्री जगदिश कळाम,श्री राजकुमार कुळसंगे, सौ.सोनिताई संदोकार,ग्रामपंचायत कर्मचारी श्री शामराव निशाने,श्री सचिन तुंबडे,श्री राकेश नैताम, श्री मानिक घोगरे,अंगणवाडी सेविका सौ.पुष्पाताई बुरे,सौ.सरिता बुरांडे,श्रीमती श्वेता प्रविण दिकोंडवार,शालेय मंत्रीमंडळातील मुख्यमंत्री पवन सरपे,उपमुख्यमंत्री सोहम गाडेमोडे, शिक्षणमंत्री दैनिक देवताळे, क्रिडामंत्री मिनाक्षी बुरे,आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण मंत्री भावेश वेलादी,सांस्कृतिक मंत्री गुंजन सोमणकर,शालेय पोषण आहार मंत्री पवन वैरागडे, वाचनालय मंत्री चैतन्या गटलेवार, विज्ञानमंत्री यज्ञा देशमुख, पाणीपुरवठा मंत्री कार्तिक झाडे, महिला व बाल कल्याण मंत्री सरवरी पोटे,विद्यार्थी सुरक्षा मंत्री गणेश जुआरे यांसह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बाल संसद सभा सर्वांच्या सहकार्याने उत्साहात पार पडली.सदर बाल संसद सभेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी संसदिय पद्धतीने विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा केली.बाल संसद सभेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी शालेय सोईसुविधा,स्वच्छता, अभ्यास पद्धती,वाचनालय,खेळ व क्रिडा साहित्य,शालेय पोषण आहार, डिजिटल साधने आदी विषयांवर प्रश्न मांडले‌. त्यावर शिक्षक व शालेय मंत्रीमंडळातील संबंधित खातेप्रमुख यांनी चर्चेच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तरे दिली.

उपस्थितांनी बाल संसदेची कार्यप्रणाली जाणून घेतली. बाल संसद सभेच्या आयोजनातुन विद्यार्थ्यांमध्ये नैतृत्वगुण, संवादकौशल्य, प्रश्न सोडविण्याची क्षमता व लोकशाही मुल्य विकसित होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. आजची बाल संसद सभा यशस्वी होण्यासाठी कैवल्य फाऊंडेशनचे फेलो गौरव सिन्हा, चंद्रकांत प्रधान व शाळेतील सहकारी शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular