Monday, June 8, 2026
HomeDhanoraअपघात रोखण्यासाठी मुरुमगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: महामार्गावरील खड्डे बुजवून गरोदर माता व...

अपघात रोखण्यासाठी मुरुमगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: महामार्गावरील खड्डे बुजवून गरोदर माता व मुलांच्या शिक्षणासाठी वाहतुकीला दिला दिलासा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /धानोरा, १९ सप्टेंबर २०२५::- गडचिरोली जिल्ह्यातील अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील खड्ड्यांनी सध्या अपघातांचे प्रमाण वाढवले होते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना प्राण गमवण्याची वेळ आली.

या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी समाजासाठी पुढाकार घेत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. पोलीस अधीक्षक श्री. निल्लोपन व पोलीस उपविभागीय अधिकारी अनिकेत हिरडे (धानोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेंग आणि राहुल चौधरी यांच्या संकल्पनेतून हे कार्य हाती घेण्यात आले.या उपक्रमांतर्गत सुमारे 12 किलोमीटरच्या अंतरात महामार्गावरील 70 ते 80 मोठे खड्डे मुरूम व गिट्टी टाकून बुजवण्यात आले.

या कामात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा सचिव रोशन कवाडकर, सीआरपीएफ ब्रावो 113 बटालियनचे अधिकारी AC शशी भूषण यादव, मुरुमगावचे सरपंच शिवप्रसाद गव्हना, पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी, स्थानिक पत्रकार बांधव, तसेच स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले.या श्रमदान उपक्रमाला राहुल भैया दुबाले, संस्थापक अध्यक्ष – महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि गृह विभाग निराकरण समन्वय समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाची साथ लाभली.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा सचिव रोशन कवाडकर यांनी स्थानिक अपघाताला निमंत्रण देणारा खड्डेमय रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुरूमगाव रोडवरील खडे बुजवण्याकरिता जेसीपी ट्रॅक्टर व पाण्याची सोय करून स्वतः तिथे श्रमदान करून रोड सुधारणा करण्याचे काम पार पाडले.या महामार्गाचा वापर शैक्षणिक कारणासाठी धानोऱ्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह, गरोदर मातांना उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी नियमितपणे होतो.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासात अडथळा निर्माण होत होता, जो आता या उपक्रमामुळे दूर झाला आहे.स्थानिक नागरिकांतून पोलीस दलाच्या या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.सामाजिक भान जपत, अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दाखवलेला पुढाकार इतर भागांसाठीही आदर्श ठरणारा आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular