Friday, May 22, 2026
HomeGadchiroliयुवा गर्जना दुर्गा माता मंडळ गडचिरोली अयोध्या नगरीत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या...

युवा गर्जना दुर्गा माता मंडळ गडचिरोली अयोध्या नगरीत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते दुर्गामातेची भक्तिभावाने आरती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२५ सप्टेंबर २०२५::- अयोध्या नगर, गडचिरोली येथील युवा गर्जना दुर्गा माता मंडळ व युवा गर्जना फाउंडेशन यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या पावन उत्सव प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा लोकप्रिय माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी भक्तिभावाने दुर्गामातेची पूजा-अर्चा करून आरती केली.

नवरात्र उत्सवाच्या औचित्याने रंगतदार रास-गरबा व दांडिया स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमुळे तरुणाईला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली व परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उपस्थित नागरिक व स्पर्धकांना मा.खा.डॉ. नेते यांनी नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी जिल्हा महामंत्री गीताताई हिंगे, भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, आशिष कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. नवरात्रोत्सवाचे हे आयोजन भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular