Tuesday, September 15, 2026
HomeSavaliव्याहाड बुज येथे मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते माता एकोरी देवीची...

व्याहाड बुज येथे मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते माता एकोरी देवीची महाआरती संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चंद्रपूर/सावली, २५ सप्टेंबर २०२५ ::- भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा लोकप्रिय माजी खासदार माननीय डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते व्याहाड बुज (ता. सावली) येथील नवरात्रोत्सवाच्या पावन निमित्ताने श्री. माता एकोरी देवीची महाआरती मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली.व्याहाड बुज हे डोंगररांगा, निसर्गसंपदा व गावाच्या दोन्ही बाजुच्या मध्ये भरगच्च तलावामुळे ओळखले जाणारे निसर्ग रमणीय गाव आहे.

या गावावर मा.खा.डॉ. नेते यांचे विशेष प्रेम असून त्यांनी आपल्या खासदार निधीतून येथे सभागृह उभारणी, सौंदर्यीकरणासह विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार कृतज्ञता व आपुलकी आहे.

भक्तिमय वातावरण:-

सायं. ७.०० वाजता झालेल्या आरती सोहळ्यात भाविक भक्त, महिला भगिनी, युवक मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरतीदरम्यान संपूर्ण परिसर श्रद्धा, भक्ती व उत्साहाने दुमदुमून गेला. गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मा.खा. डॉ. नेते यांचे मनापासून स्वागत केले.

गावकऱ्यांच्या मागण्या व आश्वासन:-

या वेळी व्याहाड बुज येथील संत निरंकारी भजन मंडळाच्या नागरिकांनी वाद्यसेट (तबला-पेटी) देण्याची मागणी केली असता, माजी खासदार डॉ. नेते यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवत लवकरच मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या सोहळ्यात भाजपा तालुका महामंत्री सचिनभाऊ तंगडपल्लीवार, माजी पंचायत समिती उपसभापती रविंद्रजी बोल्लीवार, सामाजिक व भाजपा युवा नेते नामदेवराव भोयर, मा.खा.डॉ ‌नेते यांचे सोशल मीडिया प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य पत्रुजी गेडाम, ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गुरूनुले, धनुजी चौधरी,मुकेश गेडाम,रितिक लेनगुरे,संतोष लेनगुरे, मुन्ना लेनगुरे, लव कुश, सोमा गेडाम, साईनाथ लेनगुरे, नंदाजी भोयर, गिरिधर चौधरी यांच्यासह गावातील महिला-पुरुष भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याहाड बुज गावाचे वैशिष्ट्य, माता एकोरीचे आध्यात्मिक तेज आणि डॉ. नेते यांचे गावाशी असलेले आत्मीय नाते या महाआरतीने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular