VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, २७ ऑक्टोबर २०२५::- गडचिरोली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसच्यावतीने सोमवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता धानोरा मार्गावरील सुरेश सा. पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील मैदानात भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार, खा.डॉ. नामदेव किरसान, माजी खा. मारोतराव कोवासे, आ.एड. अभिजीत वंजारी, आ. रामदास मसराम, एड.विश्वजीत कोवासे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
