Saturday, May 23, 2026
HomeChamorshiखेळासोबत शिक्षणाकडे योग्य लक्ष द्या, तेव्हाच जीवनात यशस्वी व्हाल भारतीय युवक काँग्रेसचे...

खेळासोबत शिक्षणाकडे योग्य लक्ष द्या, तेव्हाच जीवनात यशस्वी व्हाल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, २७ ऑक्टोबर २०२५::- (सगणापूर)येथे वीर शिवाजी क्रीडा मंडळ, सगनापूर यांच्या सौजन्याने भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.**या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी युवकांना प्रेरणादायी संदेश दिला.

एड. विश्वजीत कोवासे म्हणाले, खेळामुळे शरीर सुदृढ राहते, तर शिक्षणामुळे विचार सुदृढ होतात. त्यामुळे खेळ आणि शिक्षण या दोन्हींकडे योग्य लक्ष देऊनच जीवनात यश प्राप्त करता येते.*यावेळी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, भरत भाऊ घेर, वेलतूर तुकूमचे उपसरपंच दिगंबर धानोरकर, नरेश घेर निरीक्षक, खरेदी विक्री संस्था, सुनिल कन्नाके ग्रा.पं. सदस्य, प्रकाश उलपुलवार सेवा सहकारी अध्यक्ष, सगनापूर, तसेच नेहाल आभारे युवक काँग्रेस उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular