VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सामाजिक, पत्रकारिता व सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा,
गडचिरोली, 10 सप्टेंबर 2026::- दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी तथा अपर डिपरचे अध्यक्ष रुपराज वाकोडे यांचा वाढदिवस मित्रपरिवार, हितचिंतक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भोळूभाऊ सोमणानी व शीतलताई सोमणानी यांच्या हस्ते रुपराज वाकोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत निरोगी, दीर्घायुष्य आणि यशस्वी भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, जनसामान्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे तसेच विविध सामाजिक विषयांना प्रभावीपणे प्रसिद्धी देण्याचे काम रुपराज वाकोडे करीत असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले. पत्रकारितेसोबतच सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविल्याचे उपस्थितांनी सांगितले.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात भोलू सोमणानी, शीतलताई सोमणानी, नितीन चिलमवार, फुलचंद वाघाडे, सुभाष गोंगले, सचिन उमरे, शाहरुख शेख, संपत यांच्यासह मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभेच्छांचा वर्षाव, आपुलकीच्या भेटीगाठी आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थित मित्रपरिवार व हितचिंतकांनी रुपराज वाकोडे यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
