VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ०४ नोव्हेंबर २०२५::- गडचिरोली येथील कर्तव्य कक्ष क्रमांक १, आमदार कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध शहर व ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेऊन, पक्षाची रणनीती, संघटनात्मक तयारी, मतदारांशी संपर्क वाढविणे, तसेच बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे सशक्त जाळे निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आगामी निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे विजयाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद वाढविण्याचे, तसेच जनहिताच्या कामांवर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले.बैठकीत सर्व विभागीय जबाबदार कार्यकर्त्यांनी आपले अभिप्राय मांडले व क्षेत्रनिहाय नियोजनाचे आराखडे सादर करण्यात आले.

एकजूट, समन्वय आणि कार्यतत्परतेच्या बळावर भारतीय जनता पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच विजय मिळवेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख तथा समन्वयक श्री. संजयजी फांजे, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, समन्वयक श्री.प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री.रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री श्री. प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री श्री.गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री सौ. गीताताई हींगे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
