VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
स्थानिक कार्यकर्ते यांची फटाके फोडून मोठया उत्साहात आतिषबाजी,
गडचिरोली/मुलचेरा, १५ नोव्हेंबर २०२५::- बिहार विधानसभा निवडणुकीत NDA आघाडीला मिळालेल्या प्रचंड बहुमताच्या विजयाचा जल्लोष मुलचेरा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून,अतिशबाजी करत घोषणाबाजीच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला.

विजयाच्या या जल्लोषात प्रदेश सरचिटणीस रेखाताई डोळस,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,जिल्हा सचिव बादल शाह, तालुका अध्यक्ष संजीव सरकार,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,महामंत्री निखिल हलदार,ता.उपाध्यक्ष गणेश गारघाटे,महामंत्री विजय बिश्वास,सामाजिक कार्यकर्त्यां रुतांशी कुत्तरमारे, उत्तम शर्मा,गणेश बँकावार,स्वरूप पोद्दार,मोंटू सरकार,शुभम कुत्तरमारे तसेच महिला मोर्चा पदाधिकारी,स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
