Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliउज्वल, भव्यदिव्य व सांस्कृतिक परंपरेचा,देशा करीता अमुल्य योगदान देणाऱ्या आदिवासी परंपरेचा प्रेरणादायी...

उज्वल, भव्यदिव्य व सांस्कृतिक परंपरेचा,देशा करीता अमुल्य योगदान देणाऱ्या आदिवासी परंपरेचा प्रेरणादायी वारसा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

प्रकाश गेडाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,

गडचिरोली , १५ नोव्हेंबर २०२५::- भगवान बिरसा मुंडा 150 व्या जयंती वर्षानिमित्त व जनजाती गौरव दिवस निमीत्त!!**भारताच्या संस्कृतीत विविधतेचा अविभाज्य भाग असलेल्या जनजाती आदिवासी समाजाचे देशाच्या इतिहासात आणि विकास प्रवासात एक महत्वपूर्ण स्थान आहे. रामायण, महाभारत काळापासून तर स्वतंत्र्योत्तर काळापासून तर आजच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात आदिवासी समाजाचे फार मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाने केवळ आपल्या परंपरा संस्कृती आणि मुख्यव्यवस्था जपल्या नाही तर स्वातंत्र्यसंग्रामातही शौर्य बलिदान आणि स्वाभिमानाचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. या अमूल्य योगदानाची स्मृती जपण्यासाठी आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिवशी 15 नोव्हेंबरला हा दिवस” जनजाती गौरव दिवस” म्हणून देशात साजरा केला जात आहे. शूरवीरांच्या व त्यांचे योगदानाचा सन्मान म्हणून भारत सरकारने जनजाती गौरव दिल्याबद्दल समाजातर्फे भारत सरकारचे हार्दिक अभिनंदन आहे.

भगवान बिरसा मुंडा: आदिवासी अस्मितेचे प्रतीक:-

जनजाती गौरव दिवस हा महान आदिवासी नेता व स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो भगवान बिरसा मुंडा ने ब्रिटिश सत्तेविरुद्ध “उलगुलान” क्रांतीचे नेतृत्व केले आणि आदिवासी समाजाला स्वाभिमान एकता आणि स्वावलंबनाचा संदेश दिला भगवान बिरसा मुंडा हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर ते आदिवासी समाजातील सामाजिक न्याय आणि धार्मिक सुधारणा चळवळीचे अग्रदूत होते. त्यांच्या कार्याने आदिवासी समाजात नवचेतना निर्माण केली आजही त्यांची परंपरा नवनिर्माण आणि सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरत आहे पुढे पण ती ठरणार आहे.

जनजाती गौरव दिवस, वर्षाचा प्रारंभ:-

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात जनजाती गौरव वर्ष साजरे करण्यात येत आहे भारत सरकारने 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधी हा उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील आदिवासी समाजाच्या संस्कृती इतिहास आणि योगदानाचे प्रदर्शन अभ्यास व प्रचार करण्यात येणार आहे विविध मंत्रालय राज्य शासन शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक संघटनाच्या माध्यमातून सेमिनार प्रदर्शन शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व ते पुढे पण करण्यात येणार आहे.

भारत सरकार ची आदिवासी/जनजाती कल्याणाची भुमीका:-

केंद्र शासनाने व भारत सरकारने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविले आहे. प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाभियान.( पी एम जनमन) एकलव्य मॉडेल निवास शाळा वनधन विकास केंद्रे, तसेच प्रधानमंत्री आदिवासी विकास अभियान यासारखे योजना द्वारे आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, व सांस्कृतिक जतनावर भर दिला जात आहे .या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सुधारणा होत असून देशाच्या सर्व समावेशक विकासात आदिवासी समाजाला सहभाग करून घेण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रकर्षाने आदिवासी समाजाला देशात जाणवत आहे.

आदिवासी संस्कृती,वारसा,आणी आत्मसन्मानचे प्रतीक:-

जनताजी गौरव वर्ष हा केवळ स्मरणाचा उत्सव नाही तर तो आदिवासी समाजाच्या आत्मसन्मान ,संस्कृती, आणि वरशाच्या पुनर्जीवनाच्या राष्ट्रीय सोहळा आहे या उपक्रमातून भारतातील प्रत्येक नागरिकाला आदिवासी समाजाचे योगदान ओळखण्याची आणि त्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळणार आहे.

देशातील आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत अमलाग्र बदल घडून आणण्यासाठी भारत सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे पीएम जनमन योजना व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या जीवनात शाश्वत विकास घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले व ते 2029 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून भारत सरकारने याकरिता 80 हजार करोड रुपयाचा बजेट ठेवण्यात आला आहे व याकरिता 550 जिल्हे 3000 तालुके व 63 हजार देशातील गावं निश्चित करण्यात आले आहेत.

धरती आबा‌ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान:-

देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी भारत सरकार तर्फे “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” ही महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 25 प्राधान्य क्षेत्रे आणि 17 मंत्रालय निश्चित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यांची निवड या अभियानासाठी करण्यात आली असून याच 214 तालुके आणि 4975 गावे समाविष्ट आहेत. या अभियाना मार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये सर्वंकष दृष्टीकोन व अभिसरण साध्य करून प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे. अभियानात समाविष्ट गावातील अनुसूची जमातीच्या कुटुंबांच्या वैयक्तिक, व सामूहिक सुविधांच्या अभावाचा तपशील. मिशन अंतोदय 2022- 2023 च्या माहितीच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून देशातील आदिवासीचा सर्व कश विकास होणार आहे हे मात्र निश्चित आहे.

पी एम जनमन महाअभियान:-

आदिवासी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे हा दृष्टिकोन ठेवून विकासाच्या प्रवाहापासून वंचित घटकांना इतर समाजाच्या बरोबरीने समाज संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे वंचित आदिवासी समुदायाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती त सुधारणा घडवून त्याचे जीवनमान उचविण्यासाठी विविध लोक कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे आदिवासी समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याकरता प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन सुरुवात करण्यात आली आहे या अंतर्गत 9 मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वांना पक्की घरे, प्रत्येक घरी नळाचे पाणी, गावा गावापर्यंत रस्ते, प्रत्येक घरापर्यंत वीज, शिक्षणासाठी वस्तीगृह ,कौशल्य विकास, गावोगावी फिरते वैद्यकीय पथक, सर्वांना पोषण व प्रगत जीवनमान, दुर्गम भागापर्यंत दूरसंचार सेवा, अशा एकूण 11 महत्त्वाच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे व येणाऱ्या पाच वर्षात हे सर्व उद्दिष्ट जमिनी स्तरावर दिसणार आहेत हे मात्र निश्चित आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आदिवासींच्या विकासा बद्दल अनेक वल्गना करण्यात आल्या पण नियोजनबद्ध कार्यक्रमा अभावी तो पैसा आदिवासीपर्यंत पोहोचला नाही. त्यांचा सर्वकास विकास झाला नाही. मात्र भारत सरकार या नियोजनबद्ध पद्धतीने या पाच वर्षात भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षात हे सर्व साध्य करून दाखवणार आहे. त्याची प्रचिती देशातील बारा ते तेरा करोड आदिवासींना येतो आहे .देशाकरिता महाभारत रामायणापासूनच स्वातंत्र्योत्तर काळ स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ व आतापर्यंत देशाच्या करिता देशाला प्रथम स्थानी ठेवून काम कार्य करणाऱ्या व बलिदान व शहीद होणाऱ्या आदिवासी समाजाचा भारत सरकार महाराष्ट्र सरकार गौरव करत आहे. हे निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त व जनजातीय गौरव दिवसानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा सर्व आदिवासी समाजाने या सगळ्या योजना लोकांपर्यंत आदिवासी समाजापर्यंत पोहोचतील याकरिता आपापल्या स्तरावर योगदान द्यावे, प्रयत्न करावे ही आपणा सगळ्या करून अपेक्षा.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular