Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत प्रभाग ७ मध्ये उत्साहाची लाट! प्रा. अरुण उराडे व सौ. भूमिका...

गडचिरोलीत प्रभाग ७ मध्ये उत्साहाची लाट! प्रा. अरुण उराडे व सौ. भूमिका रणदिवे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रभागात सभा… 

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

भागवत साप्ताहाचे निमंत्रण देत मतदारांशी साधला संवाद,

गडचिरोली, २८ नोव्हेंबर २०२५::- गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ७ मधील उमेदवार प्रा. अरुण उराडे व सौ. भूमिका रणदिवे यांनी प्रचार दौऱ्यात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मतदारांना भेट देत आत्मीय संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरिकांना ४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भागवत साप्ताहाचे विशेष निमंत्रण देत सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला.

प्रचार भेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. प्रा. उराडे व सौ. रणदिवे यांनी विकासकामे, मूलभूत सोयीसुविधा आणि प्रभागातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी स्थानिकांसोबत झालेल्या संवादातून “विश्वास, विकास आणि संस्कारमूल्ये” या त्रिसूत्रीवर आधारित लोकाभिमुख नेतृत्वाचे आश्वासन देत दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान केले.

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आगमनाने आगामी निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक कार्यक्रमाच्या निमंत्रणामुळे प्रचारात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular