Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliप्रभाग क्रमांक 01मध्ये नगर परिषद गडचिरोली निवडणूकीत यश मिळविण्यासाठी भव्य दिव्य प्रचार...

प्रभाग क्रमांक 01मध्ये नगर परिषद गडचिरोली निवडणूकीत यश मिळविण्यासाठी भव्य दिव्य प्रचार रॅली…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०१ डिसेंबर २०२५::- या रॅलीत उमेदवार सौ .अश्विनीताई रवींद्र नैताम ( खोब्रागडे) नगराध्यक्षा पदा करिता,, अविनाश कायरकर नगर सेवक पदा करिता उभे असलेले उमेदवारांना विजयी करण्यासाठी आज दिनांक 01 डिसेंबर रोजी भव्य दिव्य रॅली काढण्यात आली यावेळी मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम साहेब आमदार यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ वासेकर यांच्या पुढाकाराने गडचिरोली नगर परिषद निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता पदाधिकारी मैदानात उतरले.

मतदाराच्या दारा दारात जाऊन संपर्क साधत जोमाने प्रचार करत जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचारात आघाडी घेतली आहे.*राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवार विजय नक्किच होईल असा आशावाद जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेखआणि मयुर धाकाते यांनी व्यक्त केला.

या प्रचार रॅलीत जिल्हा कार्याध्यक्ष रियाज भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष फहीम काझी, जिल्हा उपाध्यक्ष मयुर धाकाते, तालुका अध्यक्ष विवेक बामणवाडे, कुणाल भाऊ, चेतन भाऊ, संघमित्रा ताई खोब्रागडे, महेश वाढई, महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक यावेळी अनेक कार्यकर्ते व समर्थक रॅलीत उत्साहात सहभागी झाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular