Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अपघाताचा विचार करू आ.डॉ. मिलिंद नरोटे यांनी हिवाळी अधिवेशनात...

गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अपघाताचा विचार करू आ.डॉ. मिलिंद नरोटे यांनी हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जाहीर आभार,

गडचिरोली,१२ डिसेंबर २०२५::- गडचिरोली शहरात वाढत चाललेले रस्ते अपघात हे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका बनले आहेत. दररोज शहरात मोठ्या प्रमाणात मोठे ट्रक व जड वाहने ये-जा करत असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि अपघातांची शक्यता दुपटीने वाढत चाललेली दिसून येत आहे.

या गंभीर समस्येचा विचार करून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.मिलिंद भाऊ नरोटे यांनी हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे:

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 7 या गर्दीच्या वेळेत मोठ्या ट्रकांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्यात यावेत.

ही मागणी केल्याबद्दल गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जाहीर आभार व सदर मागणी पूर्ण झालीच पाहिजे व संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सदर नियम लागू झाले पाहिजे ही राज्य सरकारला मागणी आहे 

सदर मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यावर उतरून पुन्हा जन आक्रोश आंदोलन उभारेल.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular