Friday, July 31, 2026
HomeGhotघोट येथे सेवा महोत्सव २०२६ उत्साहात; रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

घोट येथे सेवा महोत्सव २०२६ उत्साहात; रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/घोट, ३१ जुलै २०२६::- भारतीय जनता पक्ष घोट-आष्टी मंडळ, रेगडी-हळदवाही व घोट सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्र तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा महोत्सव २०२६” अंतर्गत रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात “रक्तदान श्रेष्ठ दान – जीवनदान” या संदेशातून भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, भारत स्वाभिमान न्यासचे अशोक पोरेड्डीवार, घोटच्या सरपंच रुपाली दूधबावरे, ज्येष्ठ भाजपा नेते भारत खटी, रमेश भुरसे, अनिल पोहणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सेवा महोत्सवांतर्गत वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप, मसाला भात वितरण तसेच विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम घोट येथील साई मंदिर परिसरात राबविण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, भारत स्वाभिमान न्यास व घोट ग्रामस्थांच्या वतीने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला रेगडी-हळदवाही व घोट सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी मंडळाध्यक्ष राकेश सरकार, ज्येष्ठ भाजपा नेते संजूभाऊ पंदिलवार, माजी सरपंच अनिता रॉय, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास ऊईके, पत्रकार हेमंत उपाध्ये, रतन पोतगीवार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानुभाऊ उपाध्ये, आसिफ शेख, दिनेश मुजुमदार, महेश बिश्वास, विकास मैत्र, विशाखा सिंह, लिना बिस्वास, विलास वडेटीवार, महेंद्र मडावी, जितेन शहा, सचिन साखरकर, मेघा कुमरे, प्रवीण गेडाम, पलाश घरामी, सोम वैद्य, मिहीर बिश्वास यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि जनकल्याणाचा संदेश देण्यात आला. रक्तदानासह विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सेवा महोत्सवामुळे परिसरात सामाजिक ऐक्य आणि जनसेवेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular