VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
विकासकामांना मिळाली नवी गती,
गडचिरोली ,३० जुलै २०२६::- स्थानिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आमदार स्थानिक विकास निधीतून मौजा कुरूड येथील कस्तुरबा समाज मंदिरासमोरील ढिवर मोहल्ल्यात सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार मा. रामदासजी मसराम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

या रस्त्याच्या निर्मितीमुळे परिसरातील नागरिकांची दळणवळण व्यवस्था अधिक सुरक्षित व सुकर होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयींना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये ही भर पडणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी विकासकामे हीच जनसेवेची खरी ओळख असून मतदारसंघातील प्रत्येक गावात दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला धनपाल मिसार सर, माजी उपसभापती नितीन राऊत, सरपंच प्रीती मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा मडावी, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष विजय कुंभलवार, युवक काँग्रेस अध्यक्ष अमर भर्रे, सागर वाढई, तुलाराम लाखडे, कैलास दिघोरे, नरेश मेश्राम, शालिकराव मेश्राम, सखुबाई लाखाडे, देवराबाई मेश्राम, कल्पना निखुरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार रामदास मसराम यांचे आभार मानले. परिसरातील इतर प्रलंबित विकासकामांनाही लवकरच गती मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
