Saturday, June 6, 2026
HomeChamorshiअचानक आग लागल्याने दुचाकी जळून खाक,, खरपुंडी येथील घटना...

अचानक आग लागल्याने दुचाकी जळून खाक,, खरपुंडी येथील घटना…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

दीड लाखाची नुकसान *आर्थिक मदत मिळण्याची मागणी,

 गडचिरोली/ चामोर्शी, १७ डिसेंबर २०२५::- जिल्हा मुख्याल्यापासून पाच की. मि. अंतरावर असलेल्या मौजा खरपुंडी येथील श्री हिराजी पंढरी निकोडे यांच्या पक्या घराला उजव्या बाजूने लागून असलेल्या चाफ्याला काल सोमवारला रात्रौ 11.00 ते 12.00 वाजताच्या सुमारास अचानकपने आग लागली. यात होंडा कंपनीची M H 33 Z 2649 या क्रमांकची दुचाकी जळून खाक झाली आहे ही दुचाकी खरपुंडी येथील रहिवासी हिराजी निकोडे यांचा मालकीची असून या गाडी मालकांनी सण 08/10/2019 साली ही दुचाकी खरेदी केली होते.

मुख्य म्हणजे या दुचाकीने गाडी मालक या सीजन वर घरचा भाजीपाला विकण्यासाठी गडचिरोली येथील गुजरी मध्ये ने आन करणा चालू होता अईन सीजन मध्येच असी घटना घडल्याने हिराजी निकोडे यांचा खूप नुकसान झाला आहे.

या सोबत दुचाकी एक लाख रुपये, एक फवारणी पम्प, दोन मोटार पाईप पाच हजार रुपये आणि या सोबत इतर चिलर साहित्य असे एकूण दीड लाखापर्यंत नुकसान झाली आहे याची गंभीर दखल घेऊन या बबिचा तात्काळ पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाही दयावी असी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular